मुंबई : ‘एमएसईबी’ कंपनीअंतर्गत कार्यरत तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नियमित कर्मचाऱ्यांना ११ हजार व महावितरण कंपनीमार्फत थेट कार्यरत कंत्राटी कामगारांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. २०१३-१४ मध्ये त्यासाठी ८४.८७ कोटी रुपये खर्च झाले. २०१४-१५ साठी १०१.७९ कोटी रुपये एवढा निधी अपेक्षित आहे तर महावितरणमध्ये कार्यरत ९,४०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ४ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वीज कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान
By admin | Published: November 05, 2015 12:20 AM