शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पैसे संपले, उपचार थांबले; मुलाला जगविण्यासाठी ३ महिन्यापासून आईची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 6:11 AM

तीन महिन्यापासून सुरू आहेत उपचार, २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे

नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार, तीन महिन्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पडून आहे. डॉक्टरांकडून त्याला जगविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण उपचारात पैशांची मर्यादा आली आहे. 

आई-वडिलांनी जमा केलेली जवळची पुंजी, नातेवाईकांकडून कर्जरूपाने घेतलेले पैसे आतापर्यंत उपचारावर खर्च झाले आहेत. आता जवळचे सर्व आर्थिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे उपचारही थांबला आहे. पण आईची धडपड अजूनही थांबलेली नाही. मुलाला जगविण्यासाठी ती दारोदारी भटकत आहे. तुशाल धनिराम परदेसी हा २५ वर्षीय युवक २६ ऑक्टोबर रोजी कळमना रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर सीए रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्याचे ४ ऑपरेशन झालेले आहेत. 

रुग्णालयातील डॉक्टर त्याला जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना विश्वास आहे की तुशाल नक्कीच बरा होईल. डॉक्टरांनी दिलेल्या या दिलाशापोटी तुशालचे आईवडीलही वाटेल ती तडजोड करीत आहेत. तुशालचे वडील धनिराम हे हातमजुरीचे काम करतात. आईसुद्धा शिलाई काम करते. तुशाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मुलाचा आधार झाल्याने घर सुरळीत सुरू होते. पण २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे. या संघर्षात आई-वडिलांची जमापुंजी खर्च झाली आहे. 

नातेवाईक व कर्जरूपाने घेतलेला पैसाही त्याच्या उपचारात संपला आहे. आतापर्यंत तुशालच्या उपचारात १८ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हातचा, कर्जरूपात घेतलेला पैसा आता संपला आहे. आता डॉक्टरांनी परत एक ऑपरेशन सांगितले आहे. तुशाल चालत घरी जाईल, असा विश्वास आईला दिला आहे. आई शोभा त्याच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी भटकंती करीत आहे. कुठेतरी आशेचा दीप पेटेल, मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला आहे. मुलाला जगविण्यासाठी आईची ही धडपड, तिच्या डोळ्यातून अहोरात्र पडणारे अश्रू पुसायला समाजातील सहहृदयींनी पुढे येण्याची गरज आहे.

आईच्या अपेक्षांची ओंजळ भरावीआई शोभाची धडपड मानवी संवेदनांना पाझर फुटायला लावणारी आहे. गेल्या काही महिन्यापासून तिच्या तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रूच तरळत आहेत. तिच्या अपेक्षांची ओंजळ भरावी, यासाठी तिला मदतीचा आधार हवा आहे. हा आधार बनण्याची इच्छा असलेल्यांनी ८९९९२४५१९३ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेतील ३३४३३६४३३६६ या खात्यातसुद्धा मदत करता येईल.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAccidentअपघात