नोटबंदीचा फटका देशवासीयांसहीत परदेशी पर्यटकांनाही बसत आहे. खरेदी तसेच जेवणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची खंत परदेशी पर्यटकांनी व्यक्त केली.
राजधानी नवी दिल्लीत लग्नाच्या आदल्या दिवशी एक तरुण पैसे मिळवण्यासाठी रात्रीपासून एटीएम सेंटरबाहेरील रांगेत उभा होता.
नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णयाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले असेल तरीदेखील काही एटीएम सेंटरमध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेत नागरिकांना 500 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले. या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वसामान्यांनी बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी. केली.
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील 11 नोव्हेंबर रोजी चलनातून रद्द झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नवी दिल्लीतील बँकेबाहेर रांग लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन मोदी यांनी सर्वसामान्यांप्रमाणे बँकेबाहरे रांग लावून अहमदाबादमधील "ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स"मधून 4500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या.