शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

एकहाती सरकार, दोन हातांनी भ्रष्टाचार

By admin | Published: July 10, 2015 11:54 PM

नारायण राणे : रत्नागिरीतील मोर्चाप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह युती सरकारवर घणाघाती आरोप

रत्नागिरी : राज्यातील भाजप - सेना युतीचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. एकहाती सत्ता मागणारे आता दोन हातांनी भ्रष्टाचार करीत आहेत. शेतकरी कर्जमुक्तीची आस लावून बसला आहे. कोकणातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारी पैशांवर अमेरिका वारीच्यावेळी रोमॅन्टीक गाण्याच्या तालावर थिरकत होते. असे करून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी जिल्हा कॉँग्रेसने मोर्चाद्वारे हल्लाबोल केला. त्यावेळी मोर्चेकऱ्यांना राणे यांनी संबोधित केले. कॉँग्रेस भवन येथून दुपारी १२ वाजता निघालेला कॉँग्रेसचा मोर्चा १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी राणे यांच्यासोबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, विधानपरिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, राज्यातील भाजप - सेना युती सरकारच्या काळात कोकणातील जनता व शेतकरी महागाईच्या चरकात पिळून निघत आहेत. आंबा कर्जमुक्ती, डिझेल परतावा, वाळू - खडी - जांभा दगड प्रश्न प्रलंबित आहे. रेशनवर धान्य नाही. अंगणवाडी सेविकांना मानधन नाही. सागरी नियमन कायद्याचा प्रश्न जैसे थे आहे. मच्छीमारांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. असे असताना भ्रष्टाचाराची पंकजा चिक्की चर्चेत आहे. तावडेंच्या बोगस पदवीबरोबरच त्यांच्या दहावीतील परीक्षेवरूनही वादळ माजले आहे. राज्यात भूकबळी जात आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. खून, दरोडे, बलात्कार वाढले आहेत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत केलेली मौजमजा म्हणजे ‘जनता त्रस्त, मुख्यमंत्री मस्त’ अशीच म्हणावी लागेल. कोकणातील अनेक विकास प्रश्न तसेच आहेत. सी-वर्ल्ड, विमानतळ, रेडी बंदर, चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प ही सगळी विकासकामे ठप्प झाली आहेत. (प्रतिनिधी)नारायण राणे म्हणाले...४नको तेथे पैसा उडवल्याने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पास ४० टक्क्यांनी कात्री लागणार.४पाटबंधारेच्या ५७० योजना रद्द केल्याने कोकणातील पाटबंधारे प्रकल्प बंद होणार. ४आजच्या मोर्चाने कॉँग्रेस कार्यकर्त्यांना आॅक्सिजन मिळाला आहे. ४पर्यावरणमंत्री म्हणवणाऱ्या रामदास कदम यांना जी. डी. पी., पर्यावरण या शब्दांचा अर्थ काय ते विचारा...४राज्यभर दौरे करून भाजप सरकारचा पंचनामा करणार.४बाळासाहेब ठाकरे व उध्दव यांच्यात जमीन अस्मानाचा फरक.जिल्हा परिषद कर्जबाजारी!शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट दिले गेले आहे. एवढे पैसे महिना यायलाच हवेत. नार्वेकर कलेक्शन करणार. त्यामुळे या मंत्र्यांकडून कामाची काय अपेक्षा करणार? पूर्वीची शिवसेना आता राहिलेली नाही. २० वर्षांपासून यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. विकास सोडाच यांनी जिल्हा परिषदच कर्जबाजारी करून ठेवली आहे, आरोप राणेंनी केला.