शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मोनोरेलची टक्कर टळली

By admin | Published: July 09, 2017 3:12 AM

चेंबूर-वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर येथे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या पण सुदैवाने टक्कर टळली. या दुर्घटनेत

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूर-वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर येथे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या पण सुदैवाने टक्कर टळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ट्रॅकवर आलेल्या मोनोमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या जवानांनी तातडीने मदककार्य सुरू करत प्रवाशांची सुटका केली. दरम्यान, एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल समोरासमोर आल्याने मोनोच्या अत्याधुनिक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल (महालक्ष्मी) असा मोनोरेल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोनोरेलचा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील चेंबूर-वडाळा या मार्गावर मोनोरेल धावते आहे. तर वडाळा-जेकब सर्कल (महालक्ष्मी) या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मोनोचा दुसरा टप्पा पावसाळ्यापूर्वी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने हा टप्पा नव्या वर्षातच मार्गी लागणार आहे. परिणामी, पहिला टप्पा प्रवाशांना दिलासा देत असतानाच शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेंबूर मोनोरेल स्थानकाजवळ एकाच ट्रॅकवर मोनोरेल समोरासमोर आल्या. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच घटनास्थळी उपस्थित पोलिसांसह जवानांनी त्यांना दिलासा देण्याचे काम केले.दुसरीकडे या घटनेमुळे मोनोरेलच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला. मोनोरेलची सेवा पूर्णत: खंडित झाली. रविवारी सकाळी मोनोरेल सेवा पूर्ववत होईल, असाही दावा प्राधिकरणाने केला.मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करून मोनोरेल प्रकल्प उभारण्यात आला. चेंबूर ते वडाळा या सुमारे नऊ किलोमीटर मार्गावर सात स्थानके आहेत. २००९ साली मोनोरेल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. १ फेब्रुवारी २०१४ रोजी मोनोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोनोरेलचा पुढील टप्पा वर्षभरात सुरू होण्याची अपेक्षा आहे.एमएमआरडीए म्हणे टक्कर झालीच नाही...मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकरणी सारवासारव केली आहे. दोन्ही मोनोरेल समोरासमोर आलेल्या नाहीत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. चेंबूर दिशेकडे जाणाऱ्या मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव ही समस्या निर्माण झाली. परिणामी, घटनास्थळी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनो पाठविण्यात आल्याचे प्राधिकरणाकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले.