पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़. पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील वेंगुर्ला ११०, मालवण १००, , देवगड ९०, पणजी, रामेश्वरवाडी ८०, भिवंडी, दापोली, दोडामार्ग, हर्णे ४०, भिरा, गुहागर, मंडणगड, मुंबई (कुलाबा) ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. तसेच कोकणात सर्वत्र मध्यम ते हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात सटना बागलान १००, बारामती, माळशिरस ७०, सिन्नर ६०, देवळा, जेऊर, फलटण ५०, चंदगड, चांदवड, दौंडद्व नंदूरबार, निफाड, संगमेश्वर, शिरपूर ४०, जामखेड, मालेगाव, पुणे ३०, आजरा, अकोले, गिरना धरण, हसुल, इगतपुरी, कळवण, माढा, ओझर, सांगोला, शहादा, त्र्यंबकेश्वर, वाई, यवत २० मिमी पाऊस झाला़. मराठवाड्यात बिलोली ९०, उदगीर ७०, तुळजापूर ६०, धर्माबाद, उमरी ५०, भुम, देवणी ४०, अंबड, कंधार, नायगाव, खैरगाव, नांदेड ३०, अहमदपूर, औसा, देगलुर, कळंब, लोहा, लोहारा, मुखेड, फुलांबरी, शिरुर, अनंतपाल, सोनपेठ २०, औंढ्या नागनाथ, बदलापूर, धनसावंगी, जाळकोट, मुदखेड, परतूर, पूर्णा, रेणापूर, वस्मत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ विदर्भात देवरी ४०, आष्टी ३०, अमरावती, भिवपूर, हिंगणा, कोर्ची, मुर्तिजापूर, नागपूर, नांदूरा, सिरोंचा, उमरेड २०, अर्जुनी मोरगाव, बाळापूर, बार्शी टाकळी, बुलढाणा, चिमुर, धनोरा, इटापल्ली, कळमेश्वर, काटोल, खारंघा, कुरखेडा, मलकापूर, मोर्शी, पातूर, पौनी, सडक अर्जुनी, सालेकसा, वर्धा, वरुड १० मिमी पाऊस झाला होता़ घाटमाथ्यावरील डुंगरवाडी ५०, ताम्हिणी २, अम्ंबोणे, खोपोली १० मिमी पाऊस पडला़.
सध्या मॉन्सूनचा जोर केरळमध्ये कमी झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी, तेलंगणा, कर्नाटकची किनारपट्टी येथे मॉन्सून सक्रीय आहे़. २१ ते २४ जुलै ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बºयाच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ........इशारा : २१ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़, २२ व २३ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधाऱ २४ जुलैला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़.