ऑनलाइन लोकमत
राजरत्न सिरसाट/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - नैऋत्य मौसमी पाऊस सक्रीय झाला असून, येत्या चार ते पाच दिवसात विदर्भासह संपूूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्हयात मान्सूची सक्रियता २२ जूनपासून वाढली आहे.दरम्यान, मागील आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्यानंतर मान्सून सक्रीय झाल्याचे हे संकेत शेतकºयांना दिलासादायक ठरणारे आहेत.
२२ जून रोजी नैऋत्य मोसमी पाऊस छत्तीसगड अािण झारखंड राज्याच्या उर्वरित भागात पोहोचला आहे. तसेच विदर्भ व बिहारच्या आणखी काही भागासह पुर्व मध्यप्रदेशाच्या काही भागातही दाखल झाला आहे. महाराष्टÑात विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्हयात मान्सूनची सक्रियाता वाढली आहे.अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्"ांचा उत्तर भाग मान्सून अद्याप पोहोचला नाही पंरतु मान्सूनसाठीची स्थिती अनुकूल झाली आहे. सद्या मान्सूनची उत्तरी सीमा (एनएलएम) लॅटमधून उत्तीर्ण होत असल्याने वलसाड, नाशिक, बुलढाणा, नागपूर, मांडला, पटना अशी ही सक्रियता वाढली आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी पूर्व अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेशचे काही भाग आणि बिहार उर्वरित भाग आणि पश्चिम मधील काही भागांमध्ये अधिक अनुकूल परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसांत विदर्भासह राज्यात मान्सून पोहोचण्याचा अंदाज आहे.
ए.डी. ताठे, संचालक, विभागीय भारतीय हवामान शास्त्र विभाग, नागपूर.
पावसाचा इशारा -
२३ जून ते २६ जूनपर्यंत राज्यात ब-याच ठिकाणी पावसाची शक्यता असून २३ ते २५ जूनपर्यंत कोकण-गोवा तुरळक ठिकाणी मुसळधार तर २६ जून रोजी कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.