शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

केरळात यंदा लवकर दाखल होणार मान्सून

By admin | Published: May 14, 2016 2:57 AM

वाढत्या तापमानामुळे अंंगाची काहिली होत असल्याने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना यंदा मान्सून काहीसा अगोदरच चिंब भिजविणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविणारी खासगी संस्था स्कायमेटने हा दावा केला आहे.

नवी दिल्ली : वाढत्या तापमानामुळे अंंगाची काहिली होत असल्याने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना यंदा मान्सून काहीसा अगोदरच चिंब भिजविणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविणारी खासगी संस्था स्कायमेटने हा दावा केला आहे. त्यानुसार मान्सून दोन ते तीन दिवस अगोदरच केरळात दाखल होणार आहे. मान्सून २८ ते ३० मे दरम्यान केरळात दाखल होईल.हवामानाचे हे अंदाज चालू वर्षात मान्सूनची सुरुवात चांगली राहील असे संकेत देत आहेत. सर्वसाधारणपणे मान्सून येण्याची तारीख १ जून ही समजली जाते. या दिवशी मान्सून केरळात दाखल होतो. मान्सून लवकर आल्यास जिथे दुष्काळी परिस्थिती व पाण्याची टंचाई आहे, त्या भागांना दिलासा मिळणार आहे.भारतीय हवामान खात्यानंतर स्कायमेटनेही मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहील असा अंदाज वर्तविला आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मान्सूनच्या लवकरच आगमनाचा हा सांगावा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा आहे. (वृत्तसंस्था)> मान्सून चार दिवसांत निकोबार बेटांवर धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तीन ते चार दिवसांत मान्सून निकोबार बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मान्सूनचा वेग वाढेल, अशी माहिती ‘आयएमडी’च्या च्या संचालिका (हवामान) सुनीता देवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मान्सून साधारणपणे १५ मेपर्यंत निकोबार बेटांवर आणि त्यानंतर २० मेपर्यंत अंदमानात दाखल होतो. सध्या त्याची वाटचाल नियमित वेळेप्रमाणे होत आहे. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यामुळे १६ किंवा १७ मेपर्यंत मान्सून निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. सुनीता देवी म्हणाल्या, सध्या दक्षिणेकडून वाहणारे वारे मान्सूनचे आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर वाऱ्यांचा वेग वाढेल. ढगांच्या निर्मितीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. परंतु मान्सून केरळ किनारपट्टीवर नेमका कधी दाखल होणार, हे आताच सांगता येणार नाही.