मुंबई : राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी कोकणातून नगर, मराठवाड्यातील काही भागांतून विदर्भातील गोंदियापर्यंत मजल मारली होती. याचबरोबर आज अख्खा महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात अनेक भागांत पाऊस कोसळू लागला असून बळीराजाबरोबर उकाड्याने हैरान झालेले नागरिकही सुखावले आहेत.
संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे, दुष्काळी मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यात पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही काही ठिकाणी सरी कोसळल्या.
येत्या २४ तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात १४ जून रोजी, तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १६ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाचा अंदाज...14 जून रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे़15, 16 जून रोजी कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधारेची शक्यता आहे. १६ जून रोजी पुणे जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'
CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत
महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह
मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती
आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल