मुंबई : समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल. परिणामी मान्सूनचे वेळापत्रक आणखी बिघडेल, अशी भीती मुंबई आयआयटीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या कारणात्सव मान्सून व्यवस्थित पाहिजे असेल तर औद्योगिकरणासाठी सुरु असलेली वृक्षांची तोड ताबडतोब थांबवा. अन्यथा विनाशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयआयटीच्या अहवालात देण्यात आला आहे.जून-जुलै महिना सुरु झाला की मान्सूनचे वेध लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. आता तर जून आणि जुलै महिन्यात पाऊस पडेल की नाही? याचीही शाश्वती देता येत नाही. या हवामान बदलाचा आयआयटी मुंबईने अभ्यासपुर्ण अहवाल सादर केला आहे. मागील काही वर्षांत औद्योगिकरणाच्या नावाखाली जंगलांची तोड होत असल्याचे उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून समोर येत आहे. याबाबत आयआयटी मुंबईचे विभाग प्राध्यापक शुभिमल घोष आणि हवामान अभ्यासक सुपंथा पॉल यांनी अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, देशातील जंगलांची तोड करून त्या जागेचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याचा परिणामी हवामानावर होत आहे. तापमानात होणारी वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. उत्तर पूर्व आणि ईशान्य भारताचा विचार करता १९८० आणि २००० या कालावधीत जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आणि त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.>उपायांसाठी सरकारने पुढे यावेफॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाच्या अहवालानुसार २००९ पासून जंगलात घट झाली आहे. याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. २००९ पासूनचे अहवाल अभ्यासले तर १० ते १२ चौरस किलोमीटर जंगल दरवर्षी शेतजमिनीखाली येते. त्यामुळे निसर्गाचा हानी होते. आयआयटीने यावर अभ्यास केला ही चांगली गोष्ट आहे. पण आता यावर उपायांसाठी सरकारने पुढे आले पाहिजे- किशोर रिठे, हवामान अभ्यासक
वनतोडीमुळे मान्सून चक्र बिघडले
By admin | Published: August 25, 2016 5:32 AM