पुणो : थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली. विशेष म्हणजे, कोकण आणि विदर्भात पडणा:या पावसाने सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही हजेरी लावली. दुष्काळाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मराठवाडय़ाला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पुढील 48 तासांत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडला. कणकवली येथे सर्वाधिक 6क् मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ देवगड येथे 4क्, रत्नागिरी, केपे, कानकोन येथे 3क्, मालवण, ठाणो, बेलापूर येथे 2क्, कुडाळ, हण्रे, वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडी येथे 1क् मिमी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 2क्, महाबळेश्वर, जत, जामखेड, पाचोरा, दहिवडी-माण, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माढा येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, विदर्भातील पातुर येथे 6क्, लोणार 3क्, बेलापूर, आकोट, जळगाव जामोद, शेगाव, मंगरूळपीर येथे 2क्, देऊळगाव राजा, वाशीम येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या धरणाच्या पाणलोट क्षेत्रतही पावसाने हजेरी लावली आहे. मध्य वैतरणा तलावात 6क्, वैतरणामध्ये 4क्, अप्पर वैतरणा, भातसा तलावांमध्ये 2क्, तानसा, तुलसी तलावात 2क् मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)
मराठवाडय़ातही हजेरी
मराठवाडय़ातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. फुलंब्री येथे 5क् मिमी, अंबेजोगाई येथे 4क्, सिल्लोड, औरंगाबाद, बीड येथे 3क्, धारूर, परतूर, भूम, लातूर, कळंब, पाटोदा येथे 2क्, उस्मानाबाद, रेणापूर, परांडा, खुलदाबाद, वैजापूर, निलंगा, जालना येथे 1क् मिमी पाऊस पडला.
एक हजार कोंबडय़ा दगावल्या
च्बीड : दीर्घ विश्रंतीनंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने मराठवाडय़ात हजेरी लावली. बीडच्या वडवणी तालुक्यातील मोरवड येथे कुक्कूटपालनाच्या शेडमध्ये पाणी व गाळ गेल्याने एक हजार कोंबडय़ा दगावल्या़
च्बीड जिलतील विविध भागात 21 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद शहरासह जिलतही पावसाने हजेरी लावली. तर सोमवार दुपारी तीनच्या सुमारास हिंगोली जिलतील वारंगा फाटा परिसरात जवळपास पाऊणतास पाऊस झाला.
नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर
नाशिक : जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही कोकण व मुंबई वगळता राज्यात पावसास सुरवात न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. नाशिक विभागात सुमारे साडेपाचशे पाण्याचे टँकर सुरू असून, नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे.