शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

राज्यात पावसाचे धुमशान

By admin | Published: July 15, 2017 5:36 AM

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक/पुणे : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान सुरू असून, गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते. >पश्चिम महाराष्ट्रात धरण क्षेत्रात जोर पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोयना, नवजा या परिसरात धो...धो पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कासारी, कोदे, पाटगाव या धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. >गंगापूर धरण ६२ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर धरण पूर्णपणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.>मराठवाडा : वडवणी ४०, सोयेगाव ३०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, फुलंब्री, सेनगाव, सिल्लोड येथे प्रत्येकी २०, बीड, बिलोली, धर्माबाद, हिंगोली, नांदेड, पालम, परभणी, वैजापूर येथेही हलका पाऊस झाला. विदर्भ : चिखलदरा, चिखली येथे प्रत्येकी ३०, भंडारा, गोंदिया, कारंजा, खामगाव, तुमसर येथे प्रत्येकी २०, बुलडाणा, हिंगणघाट, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर, रिसोड आणि वाशिम येथेही चांगल्या सरी पडल्या.>कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (४०) या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने, बिकानेर कोइमतुर गाडी कणकवली स्थानकात थांबविण्यात आली होती. >पुलाला पडले भगदाड नाशिक जिल्ह्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद केली आहे. २२ जुलैनंतर जोर आणखी वाढणारराज्यात २२ जुलैनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.