शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

मान्सूनचा मुहूर्त लांबला; राज्यात १० जूनला येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 6:28 AM

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतात मान्सून विलंबाने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतात मान्सून विलंबाने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानच्या समुद्रात दाखल झालेला मान्सून उत्तर दिशेला किंचितसा पुढे सरकला असून, तो १ जून रोजी म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल; तर केरळमध्ये पोहोचण्यास ६ जून उजाडणार आहे. त्यामुळे मुंबईत सर्वसाधारण १० जूननंतर मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मान्सून केरळात ६ जूनला दाखल होईल, मात्र या वेळापत्रकात दोन दिवस मागेपुढे होतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळात स्थिरावतो.>काही राज्यांत पाऊसगेल्या २४ तासांत सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि ओरिसाच्या उत्तर भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम हिमालयावर हलक्या पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा अंदाजओडिशा, दक्षिण कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम हिमालयावर काही ठिकाणी २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.३०० कुटुंबे बेघरच्त्रिपुरात झालेल्या पावसामुळे उत्तर त्रिपुरा, उनाकोटी आणि धलाई जिल्ह्यातील शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. २५ मे रोजीच्या नोंदीनुसार ३००हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.च्२३ आणि २४ मे रोजीच्या नोंदीनुसार बांगलादेश, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमधील काही भागात मध्यम आणि मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.च्मदतीसाठी प्रशासनाकडून बचावकार्य हाती घेण्यात आले असून, पावसाचा जोर आता कमी झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस