शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पावसाळी अधिवेशन : ‘एमपीडीए’ कायद्यात महत्त्वाचा बदल; मानवी तस्करीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:01 IST

मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जामानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला

नाशिक : देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आंतरराष्टÑीय स्तरावरुन मानवी तस्करी केली जाते. देशात हा गुन्हा मेठ्या प्रमाणात फोफावत असला तरी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा असलेला कायदा कमकुवत स्वरुपाचा असून त्यासाठी महाराष्ट्रत धोकादायक कृत्यांना प्रतिबंध असलेल्या कायद्यात (एमपीडीए) संशोधन विधेयक-३२ विधानसभेत पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले यामध्ये मानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला असून गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा पोलिसांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.१३ डिसेंबर २०१७ रोजी बांग्लादेशी मुलीला नाशिकमधील सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखाण्यावर ‘नानी’कडे विक्री क रण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला,काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात विकली गेली होती. कोलकातामधील एका ग्रामीण भागात देहव्यापार बळजबरीने करून घेतला जात असताना मुलीने जीव मुठीत धरून त्या नरकसमान बाजारातून बाहेर उडी घेत पलायन केले. नाशिकमध्ये आलेल्या या बांगलादेशी तरु णीने प्रसारमाध्यमांसमोर जिवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला होता. ही घटना संपुर्ण राज्यात गाजली होती. यानंतर मागील हिवाळी अधिवेशनात आमदार देवयानी फरांदे यांनी एमपीडीए कायद्यात महत्त्वाचा बदल करत मानवी तस्करीचा त्यात समावेश करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची सरकारने दखल घेत या कायद्यात बदल करुन संशोधक विधेयक सहा महिन्यातच पावसाळी अधिवेशनात सादर केले. नव्या विधेयकामुळे मानवी तस्करी करणाºयांना यापुढे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याची कारवाई पोलिसांकडून होऊ शकते.‘मोक्का’मध्ये समावेश करामानवी तस्करीप्रकरणी गुन्हेगारांना एक वर्षासाठी तडीपार जरी करण्यात आले तरी ते गुन्हेगार मोकाटपणे दुस-या शहरांमध्ये जाऊन पुन्हा तो गुन्हा घडवून आणतील, असे पावसाळी अधिवेशनात फरांदे यांनी सभागृहात सांगितले. मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस