लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नैऋत्य मोसमी पावसाचे आग्नेय बंगालचा उपसागर व निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात रविवारी आगमन झाले़, तेथेच मान्सून सोमवारी स्थिर आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ सोमवारी राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४६़५ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १९़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ सोमवारी राज्यात कोल्हापूर १़५, सातारा ०़१, पेठ ७, नागपूर ०़१, पणजी ०़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सोमवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ०़५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १७ व १८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल़ १९ मे रोजी दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली़ कोल्हापूरसह कोकणात पाऊसशहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्वदूर दमदार मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. कोल्हापूर जिल्ह्यात साडेआठ वाजता पाऊस सुरू झाला. तब्बल पाऊस तास दमदार पाऊस होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्रीपासून मान्सूनपूर्वने दमदार हजेरी लावली. दरम्यान, समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रत्नागिरी, गोवा, मालवण, वेंगुर्लेच्या नौका सुरक्षेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झाल्या होत्या.
मान्सून अंदमानातच स्थिर
By admin | Published: May 16, 2017 2:18 AM