पुणे : मोठी प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचे आगमन शुक्रवारी दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटकाचा काही भाग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील मान्सूनने बुधवारी पुढे वाटचाल केली नसली, तरी त्याच्या ईशान्य शाखेची वाटचाल सुरू झाली असून त्याने गोलपारा, अलिपूरद्वार, गंगटोक येथे आगमन झाले आहे.आज व उद्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ‘वायू’ चक्रीवादळाने मान्सूनच्या वाटचालीचा मार्ग रोखला होता. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे २१ जूनपर्यंत दक्षिण कोकण, गोवामध्ये मान्सूनचे आगमन होईल. गेल्या २४ तासांत राजापूर (६०), अलिबाग (३९), महाबळेश्वर (२३), मुंबई (१८), रत्नागिरी (१२), पणजी (१६ मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुुंबई व पुण्यात २२ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. २३ जूनपर्यंत तो पुणे, मुंबईत स्थिरावेल. २५ जूनपर्यंत पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
मान्सून उद्या महाराष्ट्राच्या सीमेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:47 AM