ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13- दुष्काळात होरपळणा-या महाराष्ट्राला यंदा मान्सून काहीसा दिलासा देण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदबार-निकोबारमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. मान्सूनसाठी उपयुक्त वातावरण असल्यामुळे येत्या काही दिवसांतच तो अंदमान बेटांवर पडणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. यंदा नेहमीपेक्षा काही दिवस अगोदर दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा देशभरात सरासरीपेक्षा तब्बल १०६ टक्के जास्त पाऊस कोसळणार असून, पाणीटंचाईच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्रात यंदा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. कोकण विभागात दरवर्षीप्रमाणे सरासरीपेक्षा २७.५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. १ जूनपर्यंत कोकणात मान्सून डेरेदाखल होणार असून, ७ ते १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. यंदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा जोर राहणार असल्याची माहिती यावेळी पुणे वेधशाळेनं दिली आहे.यंदा देशभरात मान्सून लवकर येणार- स्कायमेटमान्सूनसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यानं देशात यंदा मेच्या दुसऱ्या आठवड्यातच मान्सून धडकण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. अंदमान व निकोबार बेटांवर यंदा १८ मे ते २० मेदरम्यान, तर केरळात २८ मे ते ३० मे या काळात मान्सूनचे येणार असल्याचं स्कायमेटनं सांगितलं आहे. १५ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होणार असून, महाराष्ट्रासह मुंबईत १० जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे स्कायमेटचा अंदाज आहे.यंदा बंगलोरमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचीही शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.
मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार
By admin | Published: May 13, 2016 5:21 PM