अर्पण लोढा/अनंत वाणी
वाकोद, ता.जामनेर : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दिवाळे काढले आहे. दिलं निसर्गाने दान मात्र शेतशिवार झालं स्मशान... असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात महसूल कर्मचाºयांना मिशन मोडवर काम करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने शेतशिवारात साचलेल्या पावसात आणि झालेल्या चिखलातून वाट तुडवत कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतशिवार गाठत आहेत.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जामनेर, चाळीसगाव, भडगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, पाचोरा, बोदवड, भुसावळ, यावलसह जिल्हाभरातील सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाच लाख पाच हजार शेतकºयांच्या शेतमालाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.साडेतीन एकर कापसाला बोंडही फुटले नाहीभूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मे महिन्यापासून कापूस लागवड केला, आधी पाऊस आला नाही, म्हणून विहिरीचे पाणी देऊन संगोपन केले, नंतर पाऊस आला तर खते देऊन निगा राखली परंतू अवकाळीने शेतातून नाल्याचेपाणी वाहू लागल्याने तण निर्माण होऊन झाडावर आलेले बोंडच फुटले नाही़ यामुळे आता या पिकाचा काहीही उपयोग होणार नसल्याची व्यथा उमर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथील शेतकरी कांतीलाल कदमबांडे यांनी मांडली़तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे़ कापूस, भूईमूग, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़‘आमचं शेत पहा, गुडघ्याइतकं पाणी हायअनिल साठे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेवगाव (जि. अहमदनगर) : ‘आमचं शेत पहा. गुडघ्याइतकं पाणी हाय. किमान दोन महिने तरी पाणी आटणार नायं आता जगायचं कसं’, असा आर्त प्रश्न शेतकरी करीत होते. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांच्या घोळक्यात उभा राहून ‘भाऊ माहा बी फार्म भरून दी’ अशी विनवणी करताना पोशिंद्याच्या चेहºयावर निराशेचे ढग दाटले होते.गावातील पारावर पांढरे कागद घेऊन शिकलेल्या तरुणांच्या भोवताली गराडा घालून उभा होते. चार-पाच शिकली सवरलेले युवक पीक विम्यासाठी लागणाºया कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज भरण्यात मग्न होती. तालुक्यातील वरूर गावात हे विदारक चित्र पाहायला मिळाले.१२ एकर बोरांचे झाले शेततळेदीपक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे,जि.धुळे : अवकाळी पावसामुळे सोनगीर शिवारात नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे करण्यास प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी अद्याप शेताच्या बांधापर्यंत पोहोचले नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. ‘लोकमत’ने प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली असता ही बाब स्पष्ट झाली. कापडणे गावासह या संपूर्ण परिसरात ८० ते ९० शेतकºयांच्या फळबागा आहेत.अतिवृष्टीमुळे येथील सोनगीर शिवारातील शेतकरी दिनेश भानुदास बडगुजर यांच्या १२ एकर शेतातील बोरांच्या बागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बागेला अक्षरश: शेततळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. बोरांच्या बागेतील जमिनीत पावसाचे पाणी झिरपत नसल्याने बोराच्या झाडांची पाने पिवळी पडत आहेतमायबाप सरकार बांधावर कधी येणार?राजाराम लोंढे /दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.परतीच्या पावसाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधींनी थेट शेतकºयांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. साधारणत: कागल तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमुगांसह कडधान्य घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने शेतकºयांना मोठा दणका दिल्याने भात, सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली आहेत. भात आणि सोयाबीन पाण्यात गेल्याने खराब होऊन अस्वे (कोंब) फुटले आहेत.