शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

दीड महिना रखरखत्या उन्हात पत्नीसाठी खोदली विहीर!

By admin | Published: May 09, 2016 4:19 AM

शेजाऱ्याने पत्नीला पाणी देण्यास नकार दिल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतमजुराने दीड महिना रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत विहिर खोदली

वाशिम,  विवेक चांदूरकरशेजाऱ्याने पत्नीला पाणी देण्यास नकार दिल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतमजुराने दीड महिना रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत विहिर खोदली. विशेष म्हणजे दुष्काळाने नैसर्गिक स्रोत आटत असताना अवघ्या १५ फुटांवर त्याला पाणी लागले. बिहारमधील ‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझी याची आठवण करून देणारी ही घटना वाशिम जिल्ह्यात घडली. या ‘वेल मॅन’ने केवळ स्वत:साठीच नाही तर या विहिरीचे पाणी गावकऱ्यांनाही उपलब्ध करून दिले आहे. दुष्काळाचे चटके विदर्भालाही बसत असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.आधी टिंगलटवाळी; आता आधारविहीर खोदण्याचे कोणतेही तंत्र माहीत नसताना तसेच हाताशी पुरेशी साधनसमग्री उपलब्ध नसतानाही त्याने रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, कामाला सुरुवात केली. गावातील इतर विहीरी आणि बोअर आटल्या असताना, बापुरावने सुरू केलेल्या खोदकामाची गावकऱ्यांनीच नव्हे, तर आप्तजनांनीही टिंगल केली; मात्र ते विचलीत झाले नाही. हा ध्येयवेडा शेतमजूर विहीर खोदूनच थांबला. रस्ता तयार करण्यासाठी तब्बल २२ वर्षे घाम गाळून डोंगर पोखरणारा बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी याची आठवण बापूराव ताजने याने सर्वांना करून दिली. आता संपूर्ण गाव त्यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी येते. बापूराव मात्र कुणालाही विरोध करीत नाही. एवढेच काय, पाण्याचा कुणाकडून ते मोबदलाही घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी गावात टिंगलटवाळीचा विषय झालेल्या बापुराव यांचा आता ग्रामस्थांना मोठा आधार झाला आहे. त्यांच्या विहीरीचे पाणी आता गावाची तहान भागवत आहे.> पाण्यासाठी सर्वांना वणवण करावी लागत आहे. या लहानशा गावातील शेतमजुर बापूराव ताजणे याच्या पत्नीने शेजाऱ्याकडे पाणी मागितले; मात्र शेजाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. वस्तुत: अडीअडचणीच्या काळात मानवतेचे दर्शन घडत असते. पण इथे ताजणे कुटुंबीयांना वेगळा अनुभव आला. हा नकार बापुरावच्या जिव्हारी लागला अन् यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्याने स्वत:च विहिर खोदण्याचा निर्धार केला.