कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिन्याभरात संबंधित विभागाचे मंत्री आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, तेथून मोकळ््या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे रविवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांना लावण्यात येणाºया ‘बीएलओ’सारखी अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी महसूल विभागाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.पवार म्हणाले, शिक्षकांच्या रास्त मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे संभाजीराव थोरात यांनी काम केले. सत्ता असो अथवा नसो, ते कामाचे कधी थांबले नाहीत. आता सरकार आपले आल्याने अपेक्षा वाढणे गैर नाही. फेबु्रवारीमध्ये राज्याचे अधिवेशन ते घेत आहेत, त्याला आम्ही सगळे हजर राहूच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आग्रह करू. आपल्या विविध प्रमुख सात मागण्या आहेत; मात्र चिंता करू नका. पूर्वी इतरांना विनंती करावी लागत होती. आता तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली असून, या मागण्यांसाठी महिन्याभरात शिक्षण, नगरविकास व ग्रामविकासमंत्री, सचिवांना घेऊन बैठक बोलावली जाईल. अर्थ विभागाची महत्त्वाची भूमिका असते, त्यांनाही सांगू. सगळ्यांना घेऊन शिक्षकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. या बैठकीतून शिक्षकांना मोकळ्या हाताने पाठविणार नाही.‘त्या शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली करणार’दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
‘शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महिन्याभरात बैठक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:04 AM