मोताळा (जि. बुलडाणा), दि. २६- बुलडाणा येथील मराठा क्रांती मूक मोर्चा आटोपून परत येताना ट्रॅक्टर उलटून २0 जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी दुपारी ४च्या सुमारास राजुर घाटात घडली. मराठा क्रांती मूक मोर्चात मोताळा तालुक्याच्या वडगाव येथील मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. दुपारी परत येत असताना राजुर घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. त्यात २0 मोर्चेकरी जखमी झाले. जखमींना बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी सखाराम वराडे आणि कमलाकर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
मोर्चेक-यांचा ट्रॅक्टर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 3:29 AM