मुंबई, दि. 5 - राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यूऔरंगाबाद शहरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागलं आहे. औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी ही लहान मुले गेली असताना ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही मुलं बिडकीनजवळील शिवनाई तलावात विसर्जनासाठी गेली होती. तर औरंगाबादमधील दौलताबाद तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला, आकाश साठे असे या मुलाचे नाव होते. पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडालीपिंपरी-चिंचवड शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाल्याची माहिती मिळते आहे. दुपारपासून पिंपरी चिंचवड फायर ब्रिगेडच्या जवानांकडून या दोन मुलांचा शोध सुरू आहे. तसंच वाकड सांगवी पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुळा नदीत बुडालेली ही मुलं गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे. मुळा नदीत बुडालेल्या सोनाजी धनाजी शेळके (वय १६, जिनतुर, परभणी) आणि रखमाजी सुदामराव वारकड (१७ पाटोडा परभणी) अशी दोघांची नावे आहेत. पुण्यात 2 तरुण वडकी तलावात बुडाले पुण्यातील वडकी येथील तलावात दोन मुले गणपती विसर्जन करतांना बुडाली. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावे आहेत त्यापैकी एकाचा मृतदेह सापडलेला असून दुसरा अद्यापही पाण्यात अडकलेला आहे. हा तलाव वडकी परिसरातील आहे.नाशिकमध्येही विसर्जनाला गालबोट नाशिकरोड चेहेडी पंपिग स्टेशन बंधारा येथे दुपारी विसर्जजनासाठी आलेला युवक भाविक किशोर कैलास सोनार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर विसर्जनावेळी डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू, मुंगसरे गावाजवळ गणेश मराळेचा मृ्त्यू झाला. बीडमध्ये विसर्जन करत असताना बीडमध्ये एकाचा मृत्यू बीडमधील माजलगाव तालुक्यात एकाचा मुलाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. येथे गणेश विसर्जन करीत असताना सरस्वती नदीत पांडुरंग महादेव घायतिडक हा मुलगा गेला तो वर आलाच नाही. पाण्यात शोधत असताना त्याचा मृतदेह सापडला. नगरमध्ये एकाचा मृत्यू अहमदनगरमधील संगमनेरमधील प्रवरा नदीच्या गंगामाई घाटात गणेश विसर्जन करताना एका तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.
जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू
जळगावमधील शेंदुर्णी ( जामनेर ) येथे घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी शामसिंग बुवा धरणात काही युवक गेले. गणपती विसर्जन करतांना बांधावरून पाय घसरला. त्यावेळी त्यांना बुडतांना पाहील्यावर वाचवण्यासाठी काही युवकांनी प्रयत्न केला.परंतू शामसिंग बुवा धरण मध्ये विहरीत बुडून मृत्यू पावले. जीवन ( सागर ) संतोष धनगर ( वय १८ ) व योगेश पुना धनगर ( वय १९ ) या युवकांचा बुडून मृत्यू झाला.