शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

दोनशेहून अधिक जणांची चौकशी

By admin | Published: April 07, 2017 1:19 AM

दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा

लोणावळा : येथील आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मयत युवक व युवतीच्या नातेवाइकांनी लोणावळा शहर पोलिसांकडे गुरुवारी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार व संशयित तसेच मयत युवक व युवती यांचे मित्र-मैत्रिणी अशा दोनशेपेक्षा जास्त जणांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे. सायबर सेल व गुन्हे प्रकटीकरणची टीम घटनेचा समांतर तांत्रिक तपास करत आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती न आल्याने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. दुहेरी खून प्रकरणातील मयत विद्यार्थी सार्थक वाकचौरे याचे वडील दिलीप वाकचौरे, मामा श्याम वालझाडे, मिलिंद वालझाडे व इतर नातेवाईक तसेच मयत श्रुती डुंबरे हीचे मोठे चुलते संतोष डुंबरे, दुसरे चुलते आशिष डुंबरे, चुलत भाऊ राहुल डुंबरे व इतर नातेवाईक यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तपास अधिकारी चंद्रकांत जाधव व पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून, पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावत आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी मयत सार्थक व श्रुती यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ज्या ठिकाणी ही दुहेरी खुनाची घटना घडली त्या ठिकाणालाही नातेवाइकांनी भेट दिली. सार्थक व श्रुती यांच्या खुनाच्या घटनेला चार दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाच्या हाती काही ठोस पुरावे लागलेले नाहीत. (वार्ताहर)