कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्रालाही बसला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात १४,१५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर एकूण २८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल २०,८५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १,९६,८९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९४.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत चोवीस तासांत १,२०७ रूग्णांची कोरोनावर मातमुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ९७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १,२०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर गेला आहे. तसंत सध्या मुंबईत १६,३४७ रुग्णांवर उपचार सुरकू आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ५१५ दिवसांवर गेला आहे.