गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत होती. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५३,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ३९,९२३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९,९२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ५३,२४९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५३,०९,२१५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ४७,०७,९८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५,१९,२५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८८.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दिलासादायक! राज्यात ५३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 8:44 PM
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, सातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट
ठळक मुद्देराज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिकसातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट