शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

By admin | Published: July 18, 2016 4:36 AM

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

मिलिंद कीर्ती,

चंद्रपूर- अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. २०१५-१६ या वर्षात मेळघाटमध्ये ४४६ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. तर, याच काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा ४६५ वर गेला होता. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचा समावेश नाही. मेळघाटप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही आदिवासी क्षेत्र असून तेथील बालके चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील एनआरसीमध्ये दाखल केली जात असतात. त्यामुळे एनआरसीमध्ये बालमृत्यू अधिक होत असल्याची नोंद झाली आहे. सर्वप्रथम १९९३मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालमृत्यंूची भयावह स्थिती उघडकीस आली होती. परिणामी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाकरिता सर्वाधिक शासकीय योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या. विविध प्रगतिशील संवर्धक योजनांमुळे मेळघाटात १०५० बालमृत्यूंची संख्या यावर्षी ४४६पर्यंत खाली आली आहे. चंद्रपूर येथे २०१४-१५मध्ये ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या वर्षी मेळघाटमध्ये ५१५ बालमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२६० तर मेळघाटात ६०० बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. २०१२-१३मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ६९६ तर मेळघाटात ४०९ बालमृत्यू झाले होते. शहरी क्षेत्राची नोंद अधिकचंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी बालमृत्यूंची नोंद केली जाते. त्यामध्ये २०१५-१६मध्ये शहरी क्षेत्र २९३ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र १७२ बालमृत्यू, २०१४-१५मध्ये शहरी क्षेत्र ५७६ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २३७ बालमृत्यू, २०१३-१४मध्ये शहरी क्षेत्र ९९२ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २६८ बालमृत्यू नोंदविण्यात आले आहेत.मेळघाट आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुलना करणार नाही. तेथील परिस्थिती आणि चंद्रपूरची परिस्थिती वेगळी आहे. आपण कुपोषणमुक्ती व बालमृत्यू नियंत्रणात चांगली प्रगती केली आहे. आपले प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., चंद्रपूर