शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

बुधवारपासून अधिक मासारंभ

By admin | Published: June 16, 2015 3:17 AM

बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून, गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून, गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात, तर आपले सण, व्रतवैकल्ये चंद्रावर अवलंबून असतात. सण, व्रतवैकल्ये ठरावीक ऋतूत येण्यासाठी चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळेच अधिक मास येत असतो. अधिक मासानंतर नीज मास येत असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. त्यालाच सौरवर्ष म्हटले जाते. चंद्राला पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी चांद्र-सौर वर्षाच्या काळात सुमारे ११ तिथींचा फरक पडत जातो. सुमारे तीन वर्षांनी अधिक महिना येतो. एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला की, पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो नीज मास समजला जातो. दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८मध्ये ज्येष्ठ, २०२०मध्ये आश्विन, २०२३मध्ये श्रावण, २०२६मध्ये ज्येष्ठ तर २०२९मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ आॅगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.