शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:44 AM2023-07-14T08:44:27+5:302023-07-14T08:45:08+5:30

आम्ही सर्व साहेबांसोबतच, मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, जयंत पाटील यांनी लगेच दिले स्पष्टीकरण

More MLAs from Sharad Pawar group will go with Ajit Pawar; Eye on Jayant Patal! | शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!

शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. लोकमत डॉट कॉमने हे वृत्त दिल्यानंतर आम्ही सगळे साहेबांसोबतच (शरद पवार) असे ट्विट जयंत पाटील यांनी केले.

शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते. पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. शरद पवार यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता.

आणखीही आमदार अजित पवार गटात  
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या होत्या.त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसांत अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यात राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते. परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे.

जयंत पाटील म्हणतात...
शरद पवार यांच्यासोबत असलेले आम्ही सगळे आमदार विचारधारेवर ठाम आहोत. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

Web Title: More MLAs from Sharad Pawar group will go with Ajit Pawar; Eye on Jayant Patal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.