शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

रुग्णालयात आणखी सुरक्षारक्षक तैनात

By admin | Published: April 06, 2017 5:37 AM

डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपानंतर राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य शासन करत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपानंतर राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य शासन करत असल्याचे चित्र आहे. १ एप्रिल रोजी मुंबईसह राज्यभरात तैनात करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सुरक्षारक्षकानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षेची कृतीशील अंमलबजावणी केल्याचे दिसून आले आहे.उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत बोलल्यानंतर डॉक्टरांनी पाचव्या दिवशी संप मागे घेतला. त्यावेळेस, मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात १ हजार १०० सुरक्षारक्षक नेमण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. त्या आश्वासनांची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरक्षेची पूर्तता करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात जे. जे रुग्णालयात ८८ सुरक्षारक्षक तर सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रुग्णालयात प्रत्येकी ५८ सुरक्षारक्षक दाखल झाले. याशिवाय, मुंबई पालिकेच्या अखत्यारितील केईएम रुग्णालयात १०५ , नायर रुग्णालयात ६८ आणि कूपर रुग्णालयात २३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)