मंगळवारी सरकारनं राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात तुकाराम मुंढे हे आरोग्य आयुक्तपदी रुजू झाले होते.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, १६ वर्षांच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची १५ पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहोती. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना देण्यात आल्या होत्या.
- याअधिकाऱ्यांच्याबदल्या
- भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
- व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
- सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
- एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.
- एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.
- तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली - नियुक्ती प्रतीक्षाधिन.