"अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय", अनिल पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:03 PM2023-07-05T12:03:35+5:302023-07-05T12:05:39+5:30

अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार  असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे.

"More than 40 MLAs along with Ajit Pawar, all whipped", claims Anil Patil | "अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय", अनिल पाटील यांचा दावा

"अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय", अनिल पाटील यांचा दावा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप रविवारी झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. आज शरद पवारआणिअजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत? याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. दरम्यान, अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार  असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे.

अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे, असे अनिल पाटील म्हणाले. तसेच, सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही. त्यामुळे याठिकाणी आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ, असेही अनिल पाटील यांनी सांगितले. याचबरोबर, 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.  

आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे. त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. या शक्तिप्रदर्शनात किती आमदार व्यासपीठावर उपस्थित राहतील. यावरून निश्चित होणार आहे की अजित पवार यांना किती आमदारांचे समर्थन आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता बोलावली आहे. यासंदर्भात व्हिपही बजावण्यात आला आहे. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: "More than 40 MLAs along with Ajit Pawar, all whipped", claims Anil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.