मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) पूर्ण सदस्यांची नेमणूक होऊन, पदभरतीप्रक्रियेला चालना कधी मिळेल, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. आयोगाच्या सहापैकी तीन सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध पदांसाठीच्या तब्बल पाच हजारांहून अधिक मुलाखती रखडल्या असून, पुढील काही महिन्यांत हीच संख्या दहा हजारांवर जाणार आहे.
एमपीएससीद्वारे विविध सरकारी पदांवर भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा टप्प्यांनुसार होते. पद भरतीप्रक्रियेत मुलाखतीचा टप्पा महत्त्वाचा असून, त्याची जबाबदारी सदस्यांच्या पॅनलकडे असते. एमपीएससीची संरचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदस्य संख्यापूर्ती झालेली नाही.
पदे रिक्त असल्याचा परिणाम काय?रखडलेल्या मुलाखतींमुळे नियुक्ती प्रक्रियेला विलंब. पर्यायाने नव्या उमेदवारांची संधी नाकारली जातेनिर्णय प्रक्रियेला विलंब होतोआयोगाच्या नियमितच्या कामकाजावर विपरीत परिणामपुढील भरतीप्रक्रियेतील मुलाखत कार्यक्रमांनाही विलंब होण्याची शक्यता
एमपीएससीसारख्या घटनात्मक संस्थेवर तीन सदस्य पदे रिक्त ठेवणे उचित नाही. त्यामुळे सदस्य नियुक्तीबाबतची सर्व प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण करून सदस्य नियुक्तीचे आदेश पुढील दहा दिवसांत काढण्यात यावेत. - महेश बडे, स्टुडंट राइट्स असोसिएशन