शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

By admin | Published: February 06, 2017 6:56 PM

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखलमाघ वारी : पत्राशेडपर्यंत भाविकांची रांगप्रभू पुजारी : पंढरपूर -

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी माघवारी असून विठूरायाचे दर्शन घेसाठी भाविक आतूर झाले आहेत़ मात्र श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.माघ वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला आहे़ परिणामी रस्त्यावरून ये-जा करणेही मुश्किल होते. चौक, बोळ, गल्लीच्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे़ त्यामुळे मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या गल्लीतील रस्त्यावर लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत़ सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत़ पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने ‘विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा-तुकारामाचा’ जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत़इन्फो बॉक्सवारीतील सोयी-सुविधा़़़पददर्शनासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेची सोयदर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत चहा, पाण्याची सोयदर्शन रांगेत होणारी घुसखोरी, चोरी रोखण्यासाठी २४ तास चोख पोलीस बंदोबस्तमंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संपूर्ण वारीवर नजर६५ एकर क्षेत्रांवर वारकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते, औषधोपचार, स्वच्छतागृहांची सोयपंढरपूर शहरात येणाऱ्या विविध मार्गावर बॅरेगेट उभारून जड वाहनांना बंदीवाखरी तळ येथे जनावरांच्या बाजाराची सोयव्यवसायीकांनी थाटली दुकाने़़़यात्रेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्गावर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी दुकानात वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे. यात प्रासादिक वस्तू, फोटो फे्रम, देवदेवतांच्या तांब्या, पितळीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, विविध धार्मिक ग्रंथ, सीडी, कॅसेट, कपडे यांचा समावेश आहे.