पुणे : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. पुणे विभागाकडून ७ ते १० नोव्हेंबर कालावधीत राज्यातील विविध शहरांसाठी तब्बल २ हजार १५० जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.९३२ बसेसचे आॅनलाइन आरक्षण सुरू झाले आहे. विशेष बसगाड्यांसोबत नियमितपणे धावणाऱ्या ३०० बसेसही उपलब्ध आहेत. दिवाळीत खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबवून सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे परिवहन महामंडळाचे पुणे विभागप्रमुख शैलेश चव्हाण यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुविधेसाठी, तसेच तक्रार निवारणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, स्वारगेट बस स्थानक, पिंपरी-चिंचवड आणि शिवाजीनगर बस स्थानकातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. या सेवेद्वारे एसटीला ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित असल्याचे चव्हाण म्हणाले. शिवनेरी बस आता सोलापूर मार्गावरही धावणार आहे.
दिवाळीसाठी पुण्याहून दोन हजार जादा बसेस
By admin | Published: October 22, 2015 1:31 AM