जयंत धुळप
अलिबाग, दि. २६ : रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच चोविस तासात जिल्ह्यात एकुण 1853.10 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान 115.82 मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकुण पाऊस 104.40 मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान 6.53 मिमी होते. दरम्यान जिल्ह्यातील वार्षीक एकुण अपेक्षीत पावसा पैकी 15.25 टक्के पाऊस पूर्ण झाला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी उरण-174, पेण-140, मुरुड-130, रोहा-129, श्रीवर्धन-125, तळा-123, पनवेल-121.60, म्हसळा-116.80, माथेरान-115, माणगांव-109, सुधागड-92, महाड-78, कर्जत- 73.70 , खालापूर-72 तर पोलादपुर-64 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग शहरात ब्राम्हणआळीत वृक्ष कोसळून वाहतूक ठप्परविवारी पहाटेच्या सुमारास अलिबाग शहरातील ब्राम्हणआळी मधील युनियन बॅन्के जवळील एक मोठा वृक्ष उन्मळून समोरच्या बिल्डींगला टेकून राहील्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. झाड तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती येथील रहिवासी प्रल्हाद पाडळीकर यांनी दिली आहे.