मुंबई : स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेमध्ये राज्यातील दहा शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत राज्यातील शहरांची निवड व्हावी यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. अपर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, प्रधान सचिव (ऊर्जा) अपूर्व चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त यु. पी. एस. मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदींसह अभियानात सहभागी झालेल्या महानगरपालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारतर्फे देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक शहराने आपले मॉडेल तयार करुन जास्तीत जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जास्तीत शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. राज्यातील दहा शहरांची निवड व्हावीअभियानांतर्गत ‘स्मार्ट लेव्हल असेसमेंट’, ‘एरिया बेस्ड डेव्हलपमेंट’, ‘पॅन सिटी डेव्हलपमेंट’ या परिमाणांनुसार नियोजनपूर्वक सुविधांची उभारणी, प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी गतिमान प्रक्रिया, सुलभ वाहतूक सुविधा, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कारभार, वाजवी किंमतीत घरांची उपलब्धता, आवश्यक तेथे पुनर्विकास आदी विविध बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्वांनी परस्पर समन्वय ठेवून राज्यातील दहा शहरांची स्पर्धेत निवड व्हावी, यासाठी एकित्रत प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शहरांच्या निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न गरजेचे
By admin | Published: November 08, 2015 12:30 AM