पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमधे ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही तब्बल ९४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळामधे धरणात अवघा ५२० ते ५२५ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. राज्यात २०१८ सालच्या मॉन्सूनमधे परतीच्या पावसाने ओढ दिली होती. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, इंदापूर आणि दौंड या भागात तीव्र पाणीटंचाई होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या देखील उभाराव्या लागल्या. मराठवाड्यात देखील तीच स्थिती होती. यंदा मात्र, मॉन्सून लांबल्याने धरणे अजूनही भरली आहेत. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा सुरु होतील. धरणातील पाणीसाठा पाहता यंदाचा उन्हाळा सुसह्य असणार आहे. राज्याची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. शुक्रवार अखेरीस (दि. १४) धरणात ९३९.९३ टीएमसी (६५.०९ टक्के) पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याच कालावधीत ५२० ते ५२५ टीएमसी (३५.७४ टक्के) पाणीसाठा होता. पाणीसाठ्याचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प असे तीन भाग पाडले जातात. त्यापैकी मोठ्या धरणांची पाणी साठ्याची क्षमता तब्बल १ हजार २७ टीएमसी आहे. सध्या त्यात ७४७.५९ टीएमसी (७२.७७ टक्के) पाणी आहे. मध्यम प्रकल्पामधे १९१.०७ टीएमसी पैकी १०७.८० टीएमसी (५६.४२ टक्के) आणि लघु प्रकल्पामधे २२५.७६ टीएमसी पैकी ८४.५३ टीएमसी (३७.४४ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामधे ३७ आणि लघु प्रकल्पामधे २५.४७ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याच काळामधे कोकणामधेच सर्वाधिक ५८.३३ टक्के पाणीसाठा होता. औरंगाबादमधे अवघा १० आणि नागपूरमधे १८.५३ आणि अमरावतीमधे ३३.९५ टक्के पाणीसाठा होता. तर, पुणे आणि नाशिक या विभागामधे देखील अनुक्रमे ४९.६१ आणि ३३.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा धरणात होता. ------
विभागनिहाय जलसाठा स्थिती टीएमसीमधे
विभाग एकूण उपयुक्तसाठा आजचा साठा आजची टक्केवारी गेल्यावर्षीची टक्केवारी
अमरावती १४८.०६ ८३.१७ ५ ६.१७ ३३.९५
औरंगाबाद २६०.३१ १४६.६० ५६.३२ १०.०३
कोकण १२३.९४ ८८.५८ ७१.४७ ५८.३३
नागपूर १६२.६७ ९९.५६ ६१.२ १८.५३
नाशिक २१२ १४७.४१ ६९.५४ ३३.४३
पुणे ५३७.१२ ३७४.५९ ६९.७४ ४९.६१
एकूण १४४४.१३ ९३९.९३ ६५.०९ ३५.७४------------------
राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसीमधे धरण आजचा उपयुक्त साठा आजची टक्केवारी गेल्यावर्षीची टक्केवारीइसापूर, यवतमाळ २१.५७ ६३.३७ ३६.२२जायकवाडी, औरंगाबाद ६४.१९ ८३.७४ १०येलदरी, हिंगोली २६.२९ ९१.९७ ००तोतलाडोह, नागपूर ३२.१३ ८९.४३ ९.१५मुळा, अहमदनगर १७ ७९.२ २०.९५गिरणा, नाशिक १४.३३ ७७.५६ २८.९४कोयना, सातारा ७४.६६ ७४.५६ ७०.४९उजनी,सोलापूर ४४.९६ ८३.९२ २२.२९