शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा

By admin | Published: January 27, 2017 3:31 PM

महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाच्या लोकमत समूहाने महाराष्ट्रीय समाजातील एक स्टायलिश पैलु प्रथमच हेरला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाच्या लोकमत समूहाने महाराष्ट्रीय समाजातील एक स्टायलिश पैलु प्रथमच हेरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन केले जात आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टिव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमत समूहाच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या  मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी,बॉलिवूड किंवा मग टिव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.
 
 
बॉलिवू़डमधील हँडसम हंक हृतिक रोशन, स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर, राधिका आपटे, सोनाली बेंद्रे, दिनो मौर्या,उपेन पटेल, गुलशन ग्रोव्हर, गायिका शाल्मली खोलगडे,  पहलाज निहलानी, अक्रीती कक्कर या बॉलिवूड सेलिब्रेटींची उपस्थिती असणार असून यासह मराठी सिनेसृष्टतील वाजले की बारा फेम अभिनेत्री अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी,  प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर-कोठारे, अभिनेता अजिंक्य देव, देवदत्त नागे, नेहा पेंडसे, प्रार्थना बेहरे, श्रुती मराठेसह चित्रपटसृष्टीतील कलाकरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता सुयश टिळक या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. 
त्यामुळे आगळ्यावेगळ्या ठरणा-या या पुरस्कार सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे.येत्या 31 जानेवारीला जे. डब्ल्यु.मॅरिएट (जुहू) हा पंचतारांकित हॉटेल मध्ये संध्याकाळी 7 वाजता अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
 
स्टाईलचे 6 फंडे
 
तुम्ही कसे दिसता, कोणते कपडे परिधान करता यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. तुमचं दिसणं तुमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यक्तिमत्त्वानुसार ठरत असतं. स्टाईल आणि फॅशन तुमच्या वागण्यातल्या, वेशभूषा, केशभूषेतील बारिकसारिक बाबींवरुन दिसत असते. तुमचे कपडे, चपला, अ‍ॅक्सेसरिज, चष्मे, अत्तर, रंगांची आवडनिवड यांचा संबंध फॅशनशी असतो. काही देशात तिथल्या संस्कृतीचा परिणाम फॅशनवर दिसून येतो. तर ज्या देशांमध्ये विविधता असते तसेच जास्तीत जास्त संबंध बाह्य जगताशी असतो व तेथे स्थलांतराचे प्रमाण जास्त असेल तर फॅशनमध्ये विविधता आढळते. फॅशन आणि स्टाइलच्या या वेगवेगळ्या बाबींचा घेतलेला आढावा...
 
१) जीन्सप्रेमी: जीन्सची पँट आणि जीन्स शर्ट हा गेल्या दोन-तीन पिढ्यांचा आवडता कपडयांचा प्रकार आहे. लगेच धुवावी न लागणारी, बराच काळ टिकणारी आणि वापरायला रफ पण दिसायला चांगली असणाऱ्या जीन्सने अल्पावधीत जगभरात सर्वांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. पहिल्यावाहिल्या जीन्सचा शोध १८७३ साली जेकब डेव्हीस आणि लेवी स्ट्राऊस यांनी लावला, तेव्हापासून जीन्स आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
 
२) लहान केस: केस कापण्याचा नवा ट्रेंड पुन्हा रुजत आहे. केशभूषेचे ट्रेंड सतत एखाद्या चक्राप्रमाणे येत जात असतात. कधी क्लीनशेवन दाढी तर कधी बुल्गॅनिन तर कधी बिअर्ड लूक असे दाढीचे प्रकार येत राहतात त्याचप्रमाणे केसांच्या बाबतीतही हे होत असते. मुलींनी केस कापण्याचा ट्रेंडही येत असतो.
 
३) विंटेज कपडे: हो केवळ विंटेज कार्सच नाही तर विंटेज कपडेही असतात.१९६० च्या आधीच्या कपड्यांना विंटेज कपडे तर १९६० नंतरच्या कपड्यांना रेट्रो फॅशनचे कपडे म्हटले जाते.
 
४) बॅगी पँटस: कमरेखाली ढगळशा बॅगी पँटस तुम्ही वापरल्या असतील. या कपड्यांची निर्मितीसुध्दा तितकीच चमत्कारिक आहे. स्टोन वॉशिंगचा शोध लावणारा संशोधक मॅरिथिएट फ्रँकोईस गेराबाउर्ड ने बॅगीचा शोध लावला असे मानले जाते. अमेरिकन तुरुंगांमध्ये कैद्यांना कमरेला कोणताही पट्टा लावण्याची मुभा नव्हती त्यामळे त्यांनी बॅगी वापरायला सुरुवात केली असे म्हटले जाते. बॅगी पँटसचा संबंध पॉप, रॉक गाण्यांशीही लावला जातो. अनेक पॉप आणि रॉक बँडसनी बॅगी वापरल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी कपड्याचा हा प्रकार उचलून धरला.
 
५) अत्तर: अत्तर किंवा पर्फ्युम हा आता सवयीचा आणि आवडीचा भाग झाला आहे. अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये अत्तर वापरले जात असल्याचे पुरावे सापडले आहेत. आजकाल फ्रुटी (फळांचा वास असणारे,) फ्लोरल (फुलांचा वास असणारे), सिगार (सिगारेटचा वास असणारे, ) असे विविध पर्फ्युम्स लोकप्रिय आहेत.
 
६) भुवया: खरंतर भुवया आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर डोळ्यांच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतात. पण भुवयांच्या वेगवेगळ्या फॅशनही रुजू होत आहेत. त्याचप्रमाणे खोट्या पापण्यांची, रंगित पापण्याची स्टाईलही आलेली आहे.