टाकवे बुदु्रक : इंग्रजी भाषा जगात वापरली जात आहे. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे भारतीय आहेत. बदलत्या काळानुरूप मातृभाषेला इंग्रजीची जोड द्या, असे आवाहन बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केले.येथील बाळराजे असवले स्कूल आणि सरपंच चिंधू असवले स्कूलच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिरीष कुलकर्णी यांच्या व्ही. बी. फाउंडेशनचे विक्रम बोके, बाळासाहेब नेवाळे, गणेश खांडगे, गणेश भेगडे, चंद्रकांत सातकर, सुनील शेळके, राजू बच्चे, अतिष परदेशी, अशोक मावकर, बाळासाहेब कडू, पांडुरंग ठाकर, प्रशांत ढोरे, सुनील भोंगाडे, विठ्ठल असवले, नथूभाऊ असवले आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले,‘‘ग्रामीण भागात अद्याप संस्कृती टिकून आहे. येथील विद्यार्थ्यामध्ये लपलेल्या कुशाग्र बुद्धीला योग्य चालना द्या. येथून बाहेर पडलेला विद्यार्थी जगात नाव कमावेल, असे घडवा. भविष्यात जगाची सत्ता भारतीयांकडे येईल. यासाठी शिक्षणाच्या रोपाला योग्य खत पाणी द्या. ’’मेरी डिसिल्व्हा यांचा विशेष सत्कार झाला. शिवाजी असवले यांनी स्वागत केले. रामदास वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. राज खांडभोर व रमेश जाचक यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी आभार मानले. तानाजी असवले, पांडुरंग मोढवे, रामदास वाडेकर, मनोज जैन, दत्ता गायकवाड, राजू कालेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)
जगात इंग्रजी बोलणारे सर्वाधिक भारतीय
By admin | Published: May 18, 2016 2:07 AM