- सुमेध वाघमारे, नागपूरराज्यातील १६ जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील तीन जिल्ह्यांत कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात कुष्ठरुग्णांच्या बाबतीत गडचिरोली पहिल्या, चंद्रपूर दुसऱ्या तर भंडारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्यावरून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची स्थिती लक्षात येऊ शकते.धक्कादायक म्हणजे, कुष्ठरोग निदान आणि निवारण यंत्रणेला सर्वसाधारण योजनेत टाकण्यात आल्याने दर दहा हजार लोकसंख्यामागे एक रुग्ण हे लक्ष्य १५ वर्षे होऊनही साध्य झालेले नाही. दुसरीकडे राज्यात लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. ‘लेप्रसी’ किंवा ‘हॅन्सेन्स डिसीझ’ या नावाने कुष्ठरोगओळखला जातो. ‘मायक्रो बॅक्टेरियम लेप्रे’ नावाचा जीवाणू हा यारोगाचे कारण आहे. तो शरीरातील मज्जातंतू, त्वचा आणि हाडे यांवर आघात करतो. नागपुरच्या सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीत गेल्या वर्षी ५४२ रुग्ण आढळलेअसून १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात (पी.आर.) ४.७७ टक्के रुग्ण आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात १,०५८ रुग्णाची नोंद झाली असून ४.५४ टक्के पी.आर आहे. भंडाराजिल्ह्यात ४३३ रुग्ण असून ३.४ टक्के पी.आर आहे.पालघर (३.२९), गोंदिया (२.३१),धुळे (२.२७), नंदूरबार (१.९८), जळगाव (१.८), वर्धा (१.४८), रायगड (१.४८), अमरावती (१.१६), नागपूर (१.१५), यवतमाळ (१.१), नाशिक (१.०८), अकोला (०.९७)तर वाशीम (०.९१) येथेहीदखल घेण्याजोगा पी.आर. आढळला आहे.जागतिक आरोग्य संघटनातसेच भारत सरकारने २००० मध्ये डिसेंबर २००५ पर्यंत कुष्ठरोगाचे दर १० हजार लोकांमागे १ रुग्ण कमी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या १५ वर्षांत हे लक्ष्यच गाठता आलेले नाही.
गडचिरोलीत सर्वाधिक कुष्ठरुग्ण
By admin | Published: January 31, 2016 1:42 AM