शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
4
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
5
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
6
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
7
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
8
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
9
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
10
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
11
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
12
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
13
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
14
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
15
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
16
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
17
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

'सर्वाधिक आमदार-खासदार-मुख्यमंत्री मराठा समाजाचे; मग आरक्षणाची काय गरज?' -राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:33 IST

'संतोष देशमुखला पैशाच्या वादातून मारले; वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध? जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका.'

Raj Thackeray Gudhi Padwa Melava : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या गुढीपाडवा मेळाव्यातून संतोष देशमुख हत्याकांडासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, 'संतोष देशमुखांना किती घाणेरड्या पद्धतीने मारले गेले. हे सगळे कशातून झाले? विंडमील, राख, खंडणीच्या पैशातून...मी आजपर्यंत ऐकले होते की, राखेतून फिनिक्स उभारी घेतो, पण बीडमध्ये राखेतून गुंड उभारतोय. विषय होता पैशाचा. वाल्मिक कराडने खंडणी मागितली, संतोष देशमुखने विरोध केला, त्याला संपवले. त्याच्या जागे दुसरा कोणी असता, तरी हेच झाले असते. पण, आपण लेबल काय लावले, वंजाऱ्याने मराठ्याला मारले. यात वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध?' असा थेट सवाल प्रमुख राज ठाकरेंनी केला. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज?'आपण कशात गुंतवून पडतोय? तुम्हाला गुंतवले गेले आहे. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पाहू नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे पाहू नका. आता दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. पण त्याकडे पाहू नका. आपल्याकडे रोजगार निर्माण होत नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुल-मुली मराठवाडा सोडून पुण्यात येतात, त्याकडे पाहू नका. आपण कशात अडकलोय, जातीपातीत! कोणी जातीचे भले केले नाही. या महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागते? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त मतदानासाठी जातीचा उपयोग करतात,' असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका...राज ठाकरे पुढे म्हणतात, 'निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू म्हणाले होते, पण काल अजित पवार म्हणाले, 30 तारखेच्या आत पैसे भरा, कर्जमाफी होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर तु्म्ही वाटेल ते बोलणार आणि त्यानंतर माघार घेणार. राज्यातील जनतेला मला विचारायचे आहे, तुम्ही मतदान करता कसे? लाडकी बहीण योजनाही बंद होणार. सरकारकडे पैसेच नाहीत. कर्ज काढून दिवाळी साजरी करायची कशाला? राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. पण, राज्यातील मुला-मुलींना कळत नाही, त्यांना जातीत गुंतवले जातेय. मूळ प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. तुम्ही मूळ प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरले पाहिजे. आपलेच लक्ष नसेल, तर त्यांचे फावणारच आहे. तु्म्ही सगळे जातीचे भेद बाजुला सारुन मराठी म्हणून उभे राहिले पाहिजे. तामिळनाडू, केरळात हिंदीला नकार देतात आणि आपण लोटांगण घालतो. आम्हालाच समजत नाही काय करायचे...इतका भांबावलेला मराठी माणूस मी कधीच पाहिला नाही.' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण