योगेश पांडे, नागपूरविधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीही तेव्हा ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र निवडून आल्यानंतर दोनच वर्षांच्या आत यातील बहुतांश आमदार ‘आॅफलाइन’ झाले आहेत.निवडणुकांच्या काळात बऱ्याच आमदारांनी कार्यकर्त्यांना ‘सोशल मीडिया’ हाताळण्याची जबाबदारी दिली होती. काही नेत्यांनी तर त्यासाठी विशेष कक्षही स्थापन केला होता. परंतु निवडणुका सरल्या आणि बरेच आमदार या ‘हायटेक’ कट्ट्यापासून दूर झाले आहे.उच्चशिक्षित आमदार ‘डिस्कनेक्ट’ : काही अपवाद वगळता नागपूर शहरातील बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत. परंतु ‘फेसबुक’सारख्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनसंपर्काच्या बाबतीत हेच आमदार माघारले असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख हे ‘सोशल मीडिया’वर अजिबात सक्रिय नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांनीच ‘फेसबुक टाइमलाइन’वर जास्त ‘पोस्ट’ टाकलेल्या आहेत. दुसरीकडे कमी शिक्षित कृष्णा खोपडे यांनी मात्र ‘सोशल कनेक्ट’च्या बाबतीत बाजी मारली आहे. ते नियमित मतदारसंघाशी निगडीत विविध बातम्या, मुद्यांवरील मत व सणांच्या शुभेच्छा ‘पोस्ट’ करतात.कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमित (बातम्या, शुभेच्छा, मत)शेवटची ‘पोस्ट’ : २६ आॅगस्ट २०१६विकास कुंभारे (मध्य नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमित (शुभेच्छा, छायाचित्रे)शेवटची ‘पोस्ट’ : २४ आॅगस्ट २०१६सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ : १ आॅक्टोबर २०१४डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ :२० आॅक्टोबर २०१४सुधाकर देशमुख (पश्चिम नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ : २५ जानेवारी २०१५अनिल सोले (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : ३ जुलै २०१६गिरीश व्यास (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : २५ आॅगस्ट २०१६प्रकाश गजभिये (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : १३ जून २०१६
नागपुरातील बहुतांश आमदार ‘आॅफलाइन’
By admin | Published: August 30, 2016 6:12 AM