शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची सध्या सर्वाधिक गरज

By admin | Published: August 22, 2016 5:20 AM

विरोधी विचारासह, तो मांडणाऱ्यांना नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व त्याची आज सर्वाधिक गरज आहे

पुणे : विरोधी विचारासह, तो मांडणाऱ्यांना नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व त्याची आज सर्वाधिक गरज आहे. हे ओळखून कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा कार्यरत व्हावे व क्रांतीची हाक द्यावी, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केले. तर स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची सध्या सर्वाधिक गरज असल्याचे मत चपळगावकर यांनी व्यक्त केले. तर तरुण प्रश्न विचारायचे बंद होत नाहीत, तोपर्यंत निवृत्त होणार नसल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले. युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, खा. हुसेन दलवाई, महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते. सप्तर्षी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी सांगून त्यांच्याशी आपले ऋणानुबंध होते. मी त्यांचा आवडता होतो, उद्धव यांची येथील उपस्थिती त्याचमुळे आहे, असे सांगितले. तोच संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी कुमार जात-पात-धर्म मानत नाहीत, आम्हीही जातपात मानत नाही; मात्र धर्म मानतो. कारण धर्म नसेल तर अधर्माची भीती असते, असे सांगितले. भाषणानंतर ते निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत सप्तर्षी यांच्यासह सर्व वक्त्यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वैचारिक ताकद काय असते ते कुमार यांनी दाखवून दिले आहे. देश ज्यामुळे सर्व क्षेत्रात मागे राहिला तेच प्रतिगामी विचार रुजवायचा प्रयत्न पुन्हा सुरू आहे. आज पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे. तांत्रिक सुधारणांमुळे आता कुमार घरबसल्या ही क्रांती करू शकतात. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे. चपळगावकर म्हणाले, हा सत्कार फक्त कुमारांचा नाही, तर त्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या तत्कालीन सर्व युवकांचा आहे. आजही तसे संघटन करण्याची गरज आहे. जातपात-धर्म व राजकीय फायदा यांचा विचार न करणारे युवक, कुमार हे पुन्हा उभे करू शकतात. स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे. (प्रतिनिधी)>उद्धव ठाकरेंचीही उपस्थितीसप्तर्षी यांची समाजवादी विचारधारा व शिवसेनेचा हिंदुत्ववाद हे परस्परविरोधी असतानाही कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यपाल होण्यासाठी कुमार एकदम फीट आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तक चाळले. त्यात एक-दोन ठिकाणी शिवसेना असा उल्लेख आहे. सविस्तर वाचनानंतर काय आहे ते समजले, असे ठाकरे म्हणाले.