शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 5:53 AM

बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी, लोकसभेत पराभूत झालेल्यांना संधी, १३ महिलांनाही मिळाली उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करून बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व १० मंत्र्यांना व विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. आमदारांना मोठ्या प्रमाणात डच्चू मिळणार अशी चर्चा असताना जुन्या शिलेदारांवर विश्वास टाकण्यात आल्याचे पहिल्या यादीवरून दिसते. १३ महिलांनाही संधी देण्यात आली आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये अनेक विद्यमान आमदारांचा तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपने पत्ता कापला होता आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवत धक्कातंत्राचा वापर केला जाईल, अशी चर्चा होती पण आजी-माजी मंत्र्यांसह विधानसभेत सातत्याने भाजपचे प्रतिनिधीत्व करत आलेले अनेक चेहरे यादीत आहेत. भाजपने विद्यमान १७ आमदारांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.

२९ मंत्री असलेल्या महायुती त्या सरकारमध्ये भाजपचे १० मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविणार या चर्चेला त्यांना भाजपचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून समोर करत आधीच पक्षनेतृत्वाकडून उत्तर देण्यात आले होते. त्यांना दक्षिण-पश्चिम नागपुरातून उमेदवारी देत या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

तीनपेक्षा अधिक वेळा आमदार- २०१४ ते २०१९ मधील फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, मदन येरावार, अशोक उइके, विद्या ठाकूर, विजयकुमार देशमुख यांनाही पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे.

चार आमदाराच्या नातेवाइकांना संधी

- पुणे जिल्ह्यातील चिंचवडचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी विद्यमान आमदार अश्विनी जगपात यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा अमोल जावळे, कल्याण पूर्वचे तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या जागी पत्नी सुलभा गायकवाड, श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिले आहे.

कोणत्या विभागातून किती उमेदवार?

विदर्भ २३, उत्तर महाराष्ट्र - १९, मराठवाडा १६, पश्चिम महाराष्ट्र १६, मुंबई १४, ठाणे - ७, पालघर- १, रायगड २, कोकण - १

बावनकुळेंसाठी सावरकरांचा पत्ता कट

■ प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची विधानसभेची गाडी २०१९ मध्ये हुकली होती. त्यावेळी बरेच मोठे नाट्य घडले. त्यांच्या पत्नीला उमेदवारी अर्ज भरायला सांगितले पण नंतर त्यांनाही नकार देण्यात आला.

■ बावनकुळे यांनी त्यावेळी कोणाच्याही विरोधात प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ते प्रदेश सरचिटणीस, विधान परिषद आमदार आणि नंतर प्रदेशाध्यक्ष नाले. त्यांना कामठीतून संधी देताना विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना अर्थातच संधी नाकारण्यात आली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे