104 गुन्हे दाखल : कायद्याच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रबोधन सप्ताह
पुणो : जादूटोणाविरोधी कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्यात या कायद्यांतर्गत 104 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये जादूटोण्याला सर्वाधिक महिलाच बळी पडत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. अपत्यप्राप्ती, करणी घालवितो, पैशांचा पाऊस पाडतो अशा अनेक भूलथापा मारून महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे यात उघड झाले आहे.
जादूटोणाविरोधी कायदा विधानसभेत मंजूर होऊन 2क् डिसेंबर 2क्13 रोजी याबाबतचा शासन आदेश निघाला. या कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असताना या कायद्याचा कितपत प्रभाव महाराष्ट्राच्या समाजजीवनावर पडला आहे याचा आढावा
महाराष्ट्र अंधo्रद्धा निमरूलन समितीने घेतला. त्याविषयी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील,
राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, माधव बागवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (प्रतिनिधी)
प्रबोधन कार्यक्रमाचे अंनिसला निमंत्रणच नाही
राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रबोधन करण्यासाठी एक समिती स्थापन करून त्याकरिता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या समितीकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचे कोणतेही निमंत्रण अथवा माहिती महाराष्ट्र अंधo्रद्धा निमरूलन समितीला देण्यात आले नसल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. प्रबोधनासाठी 14 विभागांनी कायद्याबाबत सक्रियपणो काम करावे असा प्रस्ताव देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यांनीही घेतला बोध
महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर कर्नाटक, केरळ राज्यांमध्येही या धर्तीवर कायदा करण्यात येत आहे. कर्नाटक शासनाचा मसुदाही तयार झालेला नाही. केरळमध्ये असा कायदा व्हावा याकरिता 1 लाख सह्यांचे निवेदन राज्य शासनाला देण्यात आले आहे, असे अविनाश पाटील यांनी सांगितले.