ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - दक्षिण दिल्ली येथील नेबसराई पोलीस ठाण्यात मुलाचे आजोबा जोसेफ जॉल यांनी २ सप्टेंबर २0१५ रोजी नातवाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. कालांतराने त्यांची मुलगी ऋती हिने मी मुलाला घेऊन पुणे येथे आलेली आहे, असे सांगितले. नातवाचे व आजोबाचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यामुळे जोसेफ निश्चिंत होते; मात्र येथे नववीत शिकणारा मुलगा त्याच्या आई व प्रियाकरामुळे त्याला तेथे काम करावे लागत आहे, हे जाणून त्याने, मुलाला दिल्लीला घेऊन ये, असे मुलीला त्याच्या आजोबांनी सांगितले.
■ मुलीने डिसेंबर महिन्यामध्ये ख्रिसमस सणासाठी आम्ही दोघेही नवी दिल्लीला येतो, असे सांगितले होते.दरम्यान, २४ डिसेंबर रोजी युनूस अली याने निकूने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह आम्ही राहत्या घरी पुरून ठेवला आहे, असे सांगितले. हे ऐकून जोसेफ यांना धक्काच बसला. त्यांनी दक्षिण दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. नवी दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता, त्यांचे मोबाईल बंद होते. त्यांचा थांगपत्ता लगत नव्हता. काही महिन्यांपूर्वी एका मोबाईलवरून निकोलस व त्याच्या आजोबाचे बोलणे झाले होते. त्या आधारे दिल्ली पोलिसांनी शोध घेतला असता, तो मोबाईल नंबर अली याच्या मित्राचा असल्याचे समजले. मित्राकडून अधिक माहिती घेतली असता, अली हा बेंदवाडी, फुरसुंगी येथे राहत असल्याचे समजले. या माहितीवरून दिल्ली पोलीस व हडपसर पोलीस ठाणे यांनी समांतर तपास करीत अली याच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.काही महिन्यांपूर्वी बेंदवाडी येथे हे आरोपी राहण्यास आले होते; मात्र १९ डिसेंबरपासून आरोपी फरार आहेत. घराचा दरवाजा बंद आहे, अशी माहिती पुढे आली. यानंतर पोलिसांना या मुलाचा खून झाल्याचा संशय बळावला. फुरसुंगी : जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. संबंधित महिला व तिच्या प्रियकराने दिल्ली येथून मुलाचे अपहरण करून, त्याचा निर्घृण खून करून राहत्या घरात पुरल्याची घटना फुरसुंगी येथे रविवारी (७ फेब्रुवारी) उघडकीस आली. याप्रकरणी नवी दिल्ली पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.निकोलस ऊर्फ निकू (वय १५, रा. दक्षिण दिल्ली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुलाची आई वरिता ऊर्फ ऋती (वय ४0) व तिचा प्रियकर युनूस रहेमत अली (वय ३३, सध्या रा. फुरसुंगी, मूळ रा. मुंबई) या दोघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.आज (७ फेब्रुवारी) सकाळी हडपसर पोलीस, दिल्ली पोलीस, नायब तहसीलदार पंच, साक्षीदार, कमांड हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकासमक्ष घरात प्रवेश करून, दिवाणखाली फरशी काढून पाहिली असता, या खाली खोल खड्डय़ात निष्पाप निकूचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. अत्यंत सराईतपणे सहा फूट लांबीच्या व तीन फूट रुंदीच्या तीन खोल खड्डय़ांत निकूचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावर मोठे दगड व माती टाकून पुन्हा फरशी त्याच जागेवर बसवून पुन्हा 'जैसे थे' स्थिती करून, त्यावर दिवाण ठेवून आरोपींनी पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनास्थळी नायब तहसीलदार समीर यादव, तलाठी कांबळे, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, गुन्हे निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक संतोष तासगावकर, उपनिरीक्षक रामचंद्र केदार यांनी तपास केला.