औंढा नागगनाथ: तालूक्यातील कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली.
औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला (योगेश) ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. या दरम्यान वर्षा पडोळ, श्रेयस पडोळ हा सात वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके चालक योगेश यातून बाहेर आले.
दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते.