सांगली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीची छेड काढून तिचे ठरलेले लग्न मोडल्याने हताश झालेल्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली. पलूस तालुक्यातील खटाव येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. शोभा सुरेश नागावे-पाटील (वय ४५) असे तिचे नाव आहे. मुलीची तिच्या भावी सासरच्या मंडळींना बदनामीकारक माहिती देऊन या तरुणाने तब्बल तीनवेळा लग्न मोडल्याचे उघड झाले आहे.शोभा नागावे-पाटील यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या मुलगा व मुलीसोबत खटावमध्ये राहत होत्या. मुलीला शिक्षणासाठी त्यांनी ऐतवडे-खुर्द येथे भावाकडे पाठविले होते. याच गावातील एक तरुण दोन वर्षापासून एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीची छेड काढत होता. मुलीने हा प्रकार आई व मामाला सांगितला होता. (प्रतिनिधी)
मुलीचे तीन वेळा लग्न मोडल्याने आईची आत्महत्या
By admin | Published: February 07, 2017 4:47 AM