शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कर्जफेडीसाठी धमकी हे आत्महत्येस प्रवृत्त करणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 5:23 AM

कर्जदारास कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावणे, त्यास मारहाण करणे आणि चारचौघांच्या देखत अपमानित करणे अशा प्रकारची कृती त्या कर्जदाराच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरू शकते

मुंबई : कर्जदारास कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावणे, त्यास मारहाण करणे आणि चारचौघांच्या देखत अपमानित करणे अशा प्रकारची कृती त्या कर्जदाराच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरू शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.मुंबईतील विठ्ठल नगर, मुलुंड (प.) येथील जागृती सोसायटीमधील गुरुनाथ गवळी आणि संगिता गवळी या सावकार दाम्पत्याने त्यांच्याविरुद्ध दाखल केल्या गेलेल्या आत्महत्येस प्रवत्त करण्याखेरीज अन्य गुन्ह्याच्या खटल्यातून आरोपमुक्त करून घेण्यासाठी केलेली याचिका फेटाळताना न्या. ए. एम. बदर यांनी हा निकाल दिला. आरोपमुक्तीसाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे आरोपी दाम्पत्य उच्च न्यायालयात आले होते.जागृती सोसायटीच्या इमारत क्र. ११ मध्ये राहणारा उमेश बोंबले रस्त्यावर क्रोकरी विक्रीचा धंदा करण्याखेरीज भिशीही चालवायचा. या भिशीचा व्यवसाय आतबट्ट्यात गेल्यावर त्याने शेजारच्याच इमारतीत सावकारी पेढी असलेल्या गवळी दाम्पत्याकडून १९ लाख रुपये हातकर्जाऊ घेतले होते. या उमेश बोंबले याने २८ सप्टेंबर २०१४ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यासंदर्भात पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत गवळी यांनी कर्जवसुलीसाठी केलेल्या छळाला कंटाळून उमेशने आत्महत्या केल्याचे त्याची पत्नी सुनिता हिने म्हटले होते. त्यावरून गवळी दाम्पत्यावर खटला दाखल केला गेला.सुनिताची फिर्याद आणि पोलिसांनी केलेला तपास याचा आढावा घेऊन न्या. बदर यांनी म्हटले की, आरोप निश्चित करणे किंवा आरोपीस आरोपमुक्त करण्याच्या टप्प्याला त्याच्याविरुद्धच्या आरोपांना दोषी ठरवून शिक्षा देण्याइतके सबळ पुराव्याचे पाठबळ असण्याची गरज नसते. आरोप केलेली कृत्ये आरोपीने केल्याची शक्यता त्यावरून दिसत असणेही त्यासाठी पुरेसे दिसते. सुनिताच्या फिर्यादीवरून याची पूर्तता होत असल्याने आरोपींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून आरोपमुक्त करता येणार नाही.या सुनावणीत आरोपी गवळींसाठी अ‍ॅड. अनिल गोरे, सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर एस. व्ही. गावंड यांनी तर फिर्यादी सुनितासाठी अ‍ॅड. संदिप सिंग यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)>घर नावावर करण्याचा तगादासुनिता हिने केलेल्या फिर्यादीचा हवाला देत न्या. बदर यांनी म्हटले की, कर्जफेडीसाठी उमेशने त्याचे राहते घर आपल्या नावावर करावे यासाठी गुरुनाथ गवळी रात्री अपरात्री त्याच्या घरी जाऊन त्यास धमकावत असे, असे दिसते. घरी जाऊन आणि भर रस्त्यातही त्याने उमेशला मारहाण केल्याचे दिसते. असे अपमानित जीणे जगण्यापेक्षा आयुष्य संपविण्याचा विचार उमेशच्या मनात येणे हे मानवी स्वभावाला धरूनच आहे.