मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा तसेच बहुचर्चित अशा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला २0१७ पासून सुरुवात केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी दिली. सध्या या प्रकल्पाच्या कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे जमशेद यांनी स्पष्ट केले. मालवाहतुक आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या १६ क्षेत्रातील मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांची बैठक मध्य रेल्वेच्या सीएसटीतील मुख्यालयात घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सोयिसुविधांची माहिती दिली. मुंबईत एसी लोकल येऊनही ती प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली नाही. यासंदर्भात त्यांनी एसी लोकल डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत चालविण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले. देशभरातील ४00 ए-१ आणि ए श्रेणीतील स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये मुंबईतील आठ स्थानकांचा समावेश असून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, सीएसटी, एलटीटी, कल्याण, दादर, ठाणे व पनवेलचा समावेश असल्याची माहिती जमशेद यांनी दिली. या स्थानकांचा पुर्नविकास करताना त्यामध्ये शॉपिंग सेंटर, शॉप्स, रेस्टॉरंट, कॉन्फरन्स रुम इत्यादी सुविधाही असतील. यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वेत प्रवाशांच्या सोयिसुविधांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतुद केली जात होती. मात्र गेल्या वर्षीपेक्षा १,८00 कोटी रुपयांची तरतुद केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महत्वाची बाब म्हणजे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असून त्यामुळे सोयिसुविधा दिल्यानंतरही ३६ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर हे ५0८ किलोमीटर एवढे आहे. हा प्रकल्प झाल्यास ताशी ३२0 ते ३५0 किलोमीटर वेगाने ट्रेन धावेल. त्यामुळे दोन ते अडीच तासांत ट्रेन अंतर कापेल. सध्या याच मार्गावरुन प्रवास करण्यास सात ते आठ तास लागतात. रेल्वे प्रकल्पांसाठी ८.५ लाख कोटींची तरतुददेशभरातील रेल्वे प्रकल्पांसाठी ८.५ लाख कोटींची तरतुद आहे. यातील मोठ्या प्रकल्पांसाठी १.२ लाख कोटी खर्च केले जाणार आहेत.
बुलेट ट्रेनच्या कामाला २0१७ चा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 4:31 AM